गौरीशंकरची विद्यार्थिनी आकांक्षा पवार हिची अंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेसाठी निवड
विद्यापीठ स्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त ,नविण्यपूर्ण संशोधन महाविद्यालयाच्या शैक्षणिक नावलौकिकात भर
देगाव – शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यङ्रव जि. कोल्हापूर येथे विद्यापीठस्तरीय झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयात द्वितीय वर्षात एम फार्मसी शाखेत शिकत असलेली कु. आकांक्षा पवार हिने अविष्कार संशोधन या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिने कास्यपदक पटकविले अग्रीकल्चर अँन्ङ अँनिमल हजबंङ्री या विभागातून युटीलायझेशन ऑफ व्हे टू काँम्बॅट एँसिङिफिकेशन इन एक्वा कल्चर हा नविण्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर केला होता यामध्ये तिने वाढते प्रदूषणामुळे (कार्बन डाय-ऑक्साइड) कमी होणारा पाण्याचा पी.एच व त्यामुळे मत्स्य उत्पादनात होणारी घट या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून डेअरी इंडस्ट्री मधील निरोपयोगी किंवा टाकाऊ म्हणून राहिलेले पदार्थ (व्हे) यांचा वापर करून मत्स्य पालनासाठी साठवलेल्या पाण्याचे ऍसिडिफिकेशन कमी करणे व त्यामधून माशांना ते खाण्याच्या स्वरूपात वापरणे व त्यातून मत्स्य उत्पादन वाढविणे हे शास्त्रीय दृष्ट्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले या प्रकल्पाची निवड अंतर विद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी झाली असून आकांक्षा पवार हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर ,प्रा. डॉ.मनोज शिंदे, प्रा.स्पर्षा बांदेकर याचे मार्गदर्शन लाभले.
आकांक्षा पवार हिने संशोधन क्षेत्रात प्राप्त केलेले यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरूध्द जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे,प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप, प्रबंधक हेमंत काळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
