Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गौरीशंकरच्या जडणघङणीत माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान – श्रीरंग काटेकर

गौरीशंकरच्या जडणघङणीत माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान – श्रीरंग काटेकर 

गौरीशंकरच्या जडणघङणीत माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान – श्रीरंग काटेकर 

माजी विद्यार्थ्यांचा 14 वा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ,महाविद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून 125 पुस्तके भेट, जुन्या आठवणींना उजाळा …

 लिंब – गौरीशंकरच्या शैक्षणिक जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान देऊन संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीला मोठा हातभार लावला आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी मत व्यक्त केले ते लिंब. ता. जि. सातारा येथील गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयातील 14 वा माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते .

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय राजे ,प्रा. सविता मोरे, प्रा.सारिका लोखंडे ,प्रा.स्वाती पवार, प्रा. रणजीत थवरे अदि प्रमुख उपस्थित होते .

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले स्नेहाचे ऋणानुबंध जिथे जुळतात तेथेच आपुलकी व जिव्हाळ्याची नाती निर्माण होतात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रति ठेवलेले स्नेहाचे नाते असेच कायम ठेवावे.

प्राचार्य विजय राजे म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच महाविद्यालयाच्या प्रत्येक घडामोडीत मोलाचे सहकार्य करून एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केली आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे एक व्यासपीठ या निमित्ताने महाविद्यालयाने निर्माण केले आहे .

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश एरंडे यांनी संघटनेच्या वतीने औषध निर्माण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे विविध 125 पुस्तके महाविद्यालयात भेट दिली महाविद्यालयातर्फे यावेळी औषध निर्माण क्षेत्रातील ज्ञान घेऊन विविध ठिकाणी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 25 विद्यार्थ्यांचा उचित सन्मान देऊन गौरविण्यात आले.

 तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील समीर पठाण, शीतल धुमाळ या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2500 रुपये शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी माजी विद्यार्थी सुरेश पवार, श्रुती खताळ, यशस्वी कुलकर्णी या माजी विद्यार्थीनी महाविद्यालयातील जुनी आठवण एक उजाळा दिला 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.सविता मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिवानी पोळ,प्रा. उज्वला बाल्टे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket