गौरीशंकरच्या प्राध्यापकांची संशोधन क्षेत्रात नवनिर्मिती
भारत सरकारने प्रा. दुधेश्वर क्षिरसागर ,प्रा.शुभम चव्हाण यांना गौरविले, लॅबोरटरी पिपेट उपकरणाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त
लिंब – गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. दुधेश्वर क्षिरसागर व प्रा. शुभम चव्हाण यांनी भारत सरकारच्या पेटंट कार्यालय नवी दिल्ली यांना सादर केलेल्या लॅबोरटरी पिपेट या उपकरणाला पेटंट मिळाला आहे. औषध निर्मिती करताना रसायनाचे अचूक मोजमाप करण्यासाठीचे हे उपकरण प्रा. दुधेश्वर क्षिरसागर व प्रा. शुभम चव्हाण यांनी विकसित केले आहे या उपकरणामुळे औषध निर्माण शास्त्र शाखेतील ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणे आता सोयीचे व सुलभ होणार आहे या उपकरणाच्या सहाय्याने या पुढील काळात विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाचे अचूक निष्कर्ष व संशोधन होणार आहे प्रा दुधेश्वर क्षिरसागर व प्रा शुभम चव्हाण यांच्या संशोधनात्मक कार्याबद्दल नुकतेच गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ.संतोष बेल्हेकर, डॉ. भुषण पवार ,डॉ. धैर्यशील घाडगे, अदि प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की औषधनिर्माण शास्त्र हे मानवी जीवनाशी निगडित असल्याने यासंदर्भात सातत्याने नवे नवे संशोधन होणे आवश्यक आहे प्रा.दुधेश्वर क्षिरसागर व प्रा. शुभम चव्हाण यांनी संशोधन करून बनवलेले उपकरण विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी उपयुक्त ठरेल .
प्राचार्य डॉ.योगेश गुरव म्हणाले की गौरीशंकरचे प्रा. दुधेश्वर क्षिरसागर व प्रा.शुभम चव्हाण यांनी कल्पकतेतून साकारलेले उपकरणाचा भारत सरकारच्या पेंटट कार्यालयने केलेला गौरव महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे महाविद्यालयातील अद्यावत सोयी सुविधांचा लाभ प्राध्यापकांना मिळत असल्याने त्यांच्या ज्ञानात व संशोधनात भर पडत आहे.
प्रा.दुधेश्वर क्षिरसागर व प्रा.शुभम चव्हाण यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर कायदेशीर मॅनेजर रवी जगताप यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देशमाने व आभार प्रा. स्नेहल सांवत यांनी मानले
– लॅबोरटरी पिपेट या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या संशोधनामुळे औषधनिर्माण शास्त्र शाखेतील ज्ञान घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना या पुढील काळात विविध प्रयोग करताना वेळेची बचत बरोबरच अचूक प्रयोग बाबतची सकारात्मक परिणाम मिळणे सुलभ होणार आहे देशांतर्गत स्तरावर झालेल्या या नवसंशोधनापर उपकरणाचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच औषध निर्मिती कंपन्यांना होणार आहे प्रा दुधेश्वर क्षिरसागर व प्रा.शुभम चव्हाण यांनी कल्पकतेने बनवलेले हे उपकरण भविष्यातील असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करण्यासाठी हे उपकरण कामी येणार आहे.