गौरीशंकर फार्मा महोत्सव 2024 ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद विविध स्पर्धेचे आयोजन, औषधनिर्माता दिन उत्साहात संपन्न, विजेत्याना गौरविले
लिंब – 25 सप्टेंबर जागतिक औषधनिर्माता दिनाच्या निमित्ताने गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये दिनांक 25 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये फार्मा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवामध्ये डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, पी.एच.डी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या निमित्ताने फार्मा क्षेत्रातील बदलती आव्हाने व त्यानुसार आवश्यक कौशल्य व परिपूर्ण ज्ञान आणि विकसित मनुष्यबळ निर्मिती बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयात जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत गौरीशंकर डी फार्मसी ची विद्यार्थीनी सुहासिनी शंकर माने हिने प्रथम क्रमांक मिळवला तर आकांक्षा विश्वास मोरे कॉलेज ऑफ फार्मसी मेढा हिने दुसरा तसेच समिक्षा रामचंद्र कोथिबीरे कॉलेज ऑफ फार्मसी काष्टी जि. सांगली हिने तृतीय क्रमांक मिळविला विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य विजय राजे प्रा. सविता मोरे यांनी बक्षीस देऊन गौरविले तर गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात जागतिक आरोग्य गरजा व त्यांची पूर्तता या विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्याख्याते डॉ. विनोद काजळे, डॉ. उमेश महाजन, डॉ. महादेव गोरियन, प्रसाद कुटे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
यावेळी घेण्यात आलेल्या पेपर प्रेझेंटेशन, वकृत्व ,रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धेबरोबरच नागेवाडी ता. लिंब येथे फार्मा रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच महाविद्यालय स्तरावर रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले फार्मा महोत्सव 2024 ला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर यांनी दिली.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना गौरीशंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले .
यावेळी डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहिते, प्रा. रोहन खुटाळे, प्रबंधक निलेश पाटील उपस्थित होते
फर्मा महोत्सव 2024 यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने परिश्रम घेतले घेतले.
यावेळी नागेवाडी ता. लिंब येथे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार न घेतल्यास औषधाचे दुष्परिणाम बाबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पटनाट्याची ग्रामस्थांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक आकांक्षा बेलदार, प्रा. गौरी इथापे यांनी केले व आभार प्रा. दुधेश्वर क्षिरसागर यांनी मानले
– मानवी जीवनाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत निगङीत असणारे औषधनिर्माण शास्त्र काळानुसार प्रगत झाले आहे. विविध आजारावर प्रभावी औषध निर्मिती झाल्याने मानवी जीवनात याचे खूप महत्व आहे .नव्याने विकसित झालेले ए आय तंत्रज्ञानाचा यामध्ये उपयोग केला जात असल्याने नाविन्यपूर्ण संशोधने गतिमान झाले आहेत .त्याच्या जोडीला रोबोटिक्स ची साथ लाभल्याने विविध दुर्धर व गंभीर आजारावर आता मात करणे शक्य झाले आहे .औषध निर्माण शास्त्र क्षेत्रातील ही प्रगती थक्क करणारी ठरत आहे. विद्यार्थ्यांनी या पुढील काळात उद्योजकीय कौशल्ये रुग्णसेवीशी सुसंवाद बरोबरच विकसित होणारे तंत्राची ओळख करून घेणे आवश्यक आहे याबाबत फार्मा महोत्सव 2024 विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे.