अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » खेळा » क्रिकेट » गौरीशंकर फार्मा कप स्पर्धेचे उत्साहात प्रारंभ. राज्यभरातील १२ निवडक महाविद्यालयीन संघाचा सहभाग.

गौरीशंकर फार्मा कप स्पर्धेचे उत्साहात प्रारंभ. राज्यभरातील १२ निवडक महाविद्यालयीन संघाचा सहभाग. 

गौरीशंकर फार्मा कप स्पर्धेचे उत्साहात प्रारंभ. राज्यभरातील १२ निवडक महाविद्यालयीन संघाचा सहभाग. 

देगाव- मदनराव जगताप शैक्षणिक क्रीडा संकुल देगाव येथे राज्यस्तरीय गौरीशंकर फार्मा कप चे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील निवडक १२ महाविद्यालयाच्या संघातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नामवंत संघांचा समावेश आहे. यामध्ये सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, इंद्रायणी विद्यामंदिर कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नगर, एस एन बी पी कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी कटफळ बारामती, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी अंबप कोल्हापूर, वेणूताई चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी फलटण, कॉलेज ऑफ कॉलेज ऑफ फार्मसी मसूर, कॉलेज ऑफ फार्मसी मेढा, गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब, सातारा, माणदेश कॉलेज ऑफ फार्मसी म्हसवड, गौरीशंकर सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव, या महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मेडीस्प्रे फार्मा कंपनीचे प्लांट हेड प्रवीण सोनार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मेडीस्प्रे फार्माचे अभिजीत कुलकर्णी, गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ नागेश अलुरकर, डॉ योगेश गुरव, डॉ मनोज शिंदे, डॉ अविनाश भोसले, रजिस्ट्रार हेमंत काळे, सूरज महाडिक, गौरीशंकर लिंब फार्मसीचे प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर, रजिस्ट्रार निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मेडीस्प्रे फर्मा चे प्रवीण सोनार म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधिक आहे त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. स्पर्धेतून येणारे अनुभव विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअर साठी उपयुक्त ठरते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर व गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक निलेश बळी यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ मनोज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत काळे सुरज महाडिक व गौरीशंकर टीम यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या क्रीडा गुणांना संधी मिळावी म्हणून सलग तिसऱ्या वर्षी गौरीशंकर फार्मा कपचे आयोजन देगाव येथे केलेले आहे. या स्पर्धेत विजेता संघांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेला खेळाडूंचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket