Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे अविष्कार संशोधन स्पर्धात यश

गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे अविष्कार संशोधन स्पर्धात यश

गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे अविष्कार संशोधन स्पर्धात यश

लिंब – नानासाहेब महाडीक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेढ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत आयोजीत केलेल्या विभागीयस्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धात गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल ऐज्युकेशन अँड रिसर्च लिंब महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महविद्यालयाचा शैक्षणिक नांवलैकिक उंचविला आहे यामध्ये अंतिम वर्ष एम फार्मसीमधील गीतांजली होले हिने मेडिसिन व फार्मसी या संशोधन प्रवर्गातून द्वितीय क्रमाक प्राप्त केला तर अंतिम वर्ष एम फार्मसी मधील श्रावणी गिरीगोसावी हिने कॉमर्स मॅनेजमेंट अॅन्ङ लॉ या संशोधन प्रवर्गातून तृतीय क्रमांक प्राप्त केला या विद्यार्थानीना महविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश गुरव, एम फार्मसीचे विभागप्रमुख डॉ धैर्यशील घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अतिंम वर्ष बी फार्मसी मधील प्रविण नाळे यांनी प्युअर सायन्स या संशोधन प्रवर्गातून व्दितीय क्रमाक मिळविला त्याला प्रा.किर्ती माने यांनी मार्गदर्शन केले या स्पर्थात २५० स्पर्धाकानी सहभाग घेतला होता विजेत्या विद्यार्थ्यांची पुढील विद्यापीठस्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धासाठी निवड झाली आहे.

 यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुध्द जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे , प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप, प्राचार्य डॉ योगेश गुरव ,डॉ संतोष बेल्हेकर ,डॉ भूषण पवार, प्रबंधक निलेश पाटील व अविष्कार संशोधन कमिटी सदस्य प्रा शुभम चव्हाण, प्रा सायली दळवी यांनी विद्याथ्याचे अभिनंदन केले

अविष्कार संशोधन स्पर्धात गौरीशंकर लिंब फार्मसी महविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धात चमकदार कामगिरी करतात शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये झालेल्या स्पर्धात महविद्यालयाचे तीन विद्यार्थी विजेते ठरले औषधनिर्माण क्षेत्रातील नविण्यपूर्ण माहीती व नवसंशोधनात्मक तेचा कस लागणारी ही स्पर्धा औषधनिर्माण क्षेत्रात सर्वात महत्वाची मानली जाते या स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket