गौरीशंकर देगाव फार्मसीचे तेरा विद्यार्थी जी पॅट परीक्षेत चमकले महाविद्यालयाची अदिती सावंत देशपातळीवर गुणवत्ता यादी 33 वा क्रमांक प्राप्त
संस्थेच्या शैक्षणिक शिरपेचात विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा रोवला,विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव
देगाव – उज्वल करिअरचे ज्ञानकेंद्र ठरलेल्या यशाच्या गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस( एन बी ई एम एस) द्वारा फार्मसी कौन्सिलिंग ऑफ इंडिया (पी सी आय नवी दिल्ली) यांनी शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेतलेल्या जी पॅट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून संस्थेच्या शैक्षणिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये अदिती सावंत , गणेश लोखंडे ,उदयराज मंगरुळे ,
काजल बनकर , अनिकेत कुंभार, श्रीकांत टेंबरे, पियुष कोकाटे ,निनाद देशमुख ,ओंकार पराङे, अनिकेत अंबवडे, विशाल पिसाळ , प्रदिप माने, विशाल येरेकर विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्राप्त केलेल्या यशाने सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाचा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. संध्या बुंदेल यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन
मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्रबंधक हेमंत काळे यांनी अभिनंदन केले.
चौकट – औषध निर्माण शास्त्र शाखेत नाईपर व जी पॅट या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय व स्वप्न असते या परीक्षेत बौद्धिक क्षमतेचा खरा कस लागतो विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन लाभल्यास या परीक्षेत विद्यार्थी चमकतात राष्ट्रीय स्तरावरील सर्वात सर्वोत्तम समजली जाणाऱ्या या परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात यामध्ये मोजकेच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात जी पँट परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पुढील एम फार्मसी च्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी जी पँट परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना शासन स्तरावर दरमहा 12 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती मिळते.
आदिती सावंत हिच्या गौरवस्पद कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो
राष्ट्रीय स्तरावरील जी पँट परीक्षेत देशातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावची विद्यार्थिनी अदिती सावंत हिने 33 वे स्थान प्राप्त करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला तिने मिळवलेल्या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
