गौरीशंकर डी फार्मसी देगावच्या विद्यार्थ्यांचे यश .
प्रथम वर्षाचा निकाल ८५ % तर द्वितीय वर्षाच्या ८६ %.
देगाव: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (एम. एस. बी. टी. ई.)यांनी उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, देगाव, डी. फार्मसी महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
यामध्ये महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ८५% तर द्वितीय वर्षाचा निकाल ८६ % लागला आहे. प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये महाविद्यालय स्तरावर प्रथम क्रमांक कोमल अग्रवाल 83.70% द्वितीय क्रमांक मंजुषा मोहिते 76% तृतीय क्रमांक साक्षी काळंगे 73.70% यांनी प्राप्त केला तर द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक निकिता येवले ७९.७३%,द्वितीय क्रमांक गौरी कुंभार ७७.७३%,तृतीय क्रमांक शाम देशमुख७७.५५% गुण प्राप्त करून महाविद्यालयाचा शैक्षणिक नावलौकिक वाढवला. यशस्वी विद्यार्थ्यांची संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे प्रशासकीय अधिकाऱी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, देगावचे प्राचार्य डॉ .नागेश अलुरकर डी. फार्मसी विभाग प्रमुख डॉ. अविनाश भोसले रजिस्ट्रार हेमंत काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.