सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते महादेव बापू दुधाणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा
पाचगणी (प्रवीण घाडगे )-सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष तसेच खिंगर वि. का. से. वा. सोसायटीचे चेअरमन महादेव बापू दुधाणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राज्याचे मंत्री मकरंदआबा पाटील यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री पाटील यांनी सहकार क्षेत्रातील दुधाणे यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास पाचगणी नगराध्यक्ष दिलीप बगाडे , आ.शशिकांत शिंदे , शेखर कासुर्डे, नितीनदादा भिलारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी महादेव बापू दुधाणे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.




