सहकार भूषण” धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने श्री. सिद्धार्थ शिंगटे यांना बलेनो गाडीची चावी प्रदान करताना संस्थापक चेअरमन मा. डॉ. रविंद्र भोसले
सातारा प्रतिनिधी -सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अत्यल्प व्याजदर व सुलभ कर्ज योजनांमुळे सभासदांमध्ये समाधानआहे. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा पतसंस्थेने कमी व्याजदराने व सुलभ प्रक्रियेद्वारे सहकाराच्या माध्यमातून कर्ज वितरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. सातारा शाखेच्या वतीने श्री. शिंगटे यांना मारुती बलेनो झिटा वाहन तारण कर्जाचे वितरण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. रविंद्र भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यावेळी म्हणाले, “धन्वंतरी पतसंस्था फक्त नफ्यासाठी नाही तर सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करते. सभासद हित आणि उन्नती हेच ध्येय संस्थेचे सर्वप्रथम आहे इतर बँकांच्या तुलनेत अत्यल्प व्याजदर व कागदपत्रांची पूर्तता कमीत कमी वेळेत करून तात्काळ कर्ज मंजूर केले जाते. संस्थेचे सर्व व्यवहार अतिशय पारदर्शक असून कोणतेही छुपे शुल्क घेतले जात नाही. हप्ता व व्याजाची संपूर्ण माहिती आधीच दिली जाते. वाहन तारण, गृह कर्ज, सोने तारण, व्यवसाय कर्ज, प्रॉपर्टी तारण अशा विविधकर्ज योजना धन्वंतरी पतसंस्था राबवत आहे याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन मा. चेअरमन मा. डॉ. रवींद्र भोसले यांनी केले व श्री. शिंगटे यांना शुभेछया दिल्या.
संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. मा. कांत फडतरे म्हणाले कि, धन्वंतरी पतसंस्थेचे व्याजदरही इतर बँकांच्या तुलनेने कमी आहेत. शिवाय नियमित परतफेड केल्यास व्याजदरात रिबेट मिळतो, ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे. धन्वंतरी पतसंस्थेने आजपर्यंत रु.188 कोटी ठेवी, रु. 156 कोटीपेक्षा जास्त कर्जवाटप, रु 95 कोटी गुंतवणूक, शून्य टक्के एनपीए ठेवला आहे. 98% वसुलीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून नफ्यातील हिस्सा सभासदांना लाभांश रूपाने परत दिला जातो.
श्री. शिंगटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, “सुलभ कर्ज प्रक्रिया हीच ओळखसंस्थेची असल्याने व इतर ठिकाणी कर्जासाठी हेलपाटे मारावे लागतात. परंतु धन्वंतरी पतसंस्थेत शाखाधिकाऱ्यांनी स्वतः मार्गदर्शन करून सुलभ पद्धतीने प्रक्रिया केली.धन्वंतरीच्या या विश्वासाह व आपुलकीच्या सेवेमुळे माझ्या जीवनातील प्रगतीस सुरवात झाली आहे .
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. कांत फडतरे व संस्थेचे सर्व संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे,, डॉ, शकिल आतार, डॉ, हेमंत शिंदे, डॉ.अभिजित भोसले, डॉ, श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ, सारिका मस्कर, डॉ. हर्षाला बाबर, डॉ, नारायण तांबे, डॉ. कोंडूगले, श्री सूर्यकांत देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिंगणे, सह. उपमुख्य कार्य. अधिकारी सौ. मुरूमकर, प्रशासन अधिकारी- श्री मुल्ला, शाखाधिकारी-पराग बोडस व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .




