भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
सातारा:- भारतीय सैन्यदल , नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना (ssb) या परिक्षेची पुर्व तयारी करुण घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे शासनामार्फत महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 21 ते 30 स्प्टेंबर 2026 या कालावधीत एसएसबी कोर्स आयोजित करण्यात येत आहे. कोर्सेससाठी प्रशिक्षणाची निशुल्क् सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र .नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रं. 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्रं. ९१५६ ०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.





