सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणाची पुन्हा चौकशी- वनमंत्री गणेश नाईक

जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणाची पुन्हा चौकशी- वनमंत्री गणेश नाईक

जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणाची पुन्हा चौकशी– वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि.१८ : जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणात १५ सप्टेंबर २०२५ रोजी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना संशयास्पद लावारिस अवैध लाकूड आढळून आले. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात पुन्हा चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत दिली.

जिवती तालुक्यातील शेणगाव वन उपक्षेत्रातून अवैध सागवान तस्करी होत असल्याबाबत विधानसभेत सदस्य देवराव भोंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत विजय वडेट्टीवार व सुमित वानखेडे यांनी सहभाग घेतला.

वनमंत्री नाईक म्हणाले, २९ ऑगस्ट, २०२५ रोजी एका पिकअप वाहनाने चिखली खुर्द येथील अस्थायी तपासणी नाका तोडून पळ काढल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच सध्या असलेला तात्पुरता तपासणी नाका स्थायी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेणगाव उपक्षेत्रातून अवैध तस्करी करणाऱ्या काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती व संभाव्य रॅकेटचा शोध घेण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल.

वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. संबंधित भागात गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असल्यास त्यांचा पूर्णतः बंदोबस्त करण्यात येईल. याशिवाय वन विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तत्काळ देण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार मजुरांची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket