वनविभागाची मदत : धावली (झुंगटी) येथे बिबट्याचा हल्ला; कालवड ठार
सातारा प्रतिनिधी – धावली (झुंगटी) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात श्री. लक्ष्मण बहिरजी कोकरे यांची कालवड जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच संबंधित जबाब नोंदवून जिओ-टॅग फोटोही घेण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी मा. पशुधन विकास अधिकारी, परळी (श्रेणी १) यांच्याकडून अहवाल घेऊन प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
या घटनेबाबत वेळेत माहिती दिल्यामुळे अंकुश कोकरे यांचे विशेष सहकार्य लाभले, त्यामुळे वन विभागाला त्वरित घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले.वनपाल राजाराम काशीद यांनी तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा, जबाब ई कागद पत्र तयार केली
दरम्यान, सातारा वन विभागाने नेहमीप्रमाणे तत्परता दाखवत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत मार्गदर्शन केले असून, अशा प्रसंगी वन विभागाची मदत शेतकऱ्यांसाठी मोलाची ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




