अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » खाटीक समाजाचा नितेश राणेंना ‘झटका’, ‘हलाल’ मटणच विकण्याचा निर्धार

खाटीक समाजाचा नितेश राणेंना ‘झटका’, ‘हलाल’ मटणच विकण्याचा निर्धार

खाटीक समाजाचा नितेश राणेंना ‘झटका’, ‘हलाल’ मटणच विकण्याचा निर्धार

महाराष्ट्रात सध्या झटका, हलाल आणि मल्हार प्रमाणपत्रावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्राचे मत्स पालन मंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच याबाबत विधान केलं होतं. देशातील हिंदूंनी झटका मटण खावं, हलाल मटण खाऊ नये, अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलाल मटण अशा प्रकारचा नवीन संघर्ष बघायला मिळत आहे. राणेंच्या वक्तव्याचा अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी विरोध केला आहे. काहीही कारण नसताना राणे अशाप्रकारचा वाद पेटवत असल्याचा आरोप केला जात आहे.

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर खाटीक समाज आक्रमक झाला आहे. आम्ही हलाल मटणच विक्री करणार अशी भूमिका खाटीक समाजानं घेतली आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत खाटीक समाजाने हलाल मटणच विक्री करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा निषेध केला आहे. खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. नाशिकचा हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार, अशी भूमिकाही या बैठकीत घेतली आहे.

नितेश राणे यांनी अलीकडेच मल्हार सर्टीफिकेटची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण वाद सुरू झाला आहे. नितेश राणे यांनी घोषणा केली की, आता मटणासाठी वेगळे प्रमाणपत्र दिले जाईल, जेणेकरून हिंदूंना हलाल मटण खावं लागणार नाही. जी दुकाने फक्त हिंदूच चालवतील त्यांना झटका मटणाचे मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल.

मल्हार सर्टीफिकेट नक्की काय आहे?

मल्हार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजासाठी त्यांच्या हक्कांसाठी मटणाचा एक चांगला पर्याय आणण्यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वर्षानुवर्षे फक्त हलाल मटणच खावे, अशी सक्ती केली जात आहे. एकतर हलाल खा, नाहीतर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी स्थिती आहे. यासाठी आम्ही एक चांगला पर्याय आणला आहे. हलाल अन्न हे हिंदू धर्मात लिहिलेले नाही, ते इस्लाम धर्मात लिहिलेले आहे. म्हणून जर कोणी असा चांगला पर्याय घेऊन येत असेल तर मी त्यांना पाठिंबा देतो. झटका मटन दुकानांना मल्हार सर्टीफिकेट दिलं जाईल. मल्हार प्रमाणपत्र नसलेल्या दुकानांमधून हिंदुंनी मटण खरेदी करू नये, असे आवाहनही यावेळी राणेंनी केलं होतं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket