अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सातारा, दि.24: चालू वर्षात एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, जिल्ह्यातील पशुधनासाठी मुबलक आणि सकस चारा उपलब्ध करून देणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे. या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना (DPC) सन २०२६-२७ अंतर्गत, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात उच्च दर्जाच्या चारा बियाण्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून खरेदी करण्यात आलेली ही बियाणे थेट तालुकास्तरावरील पंचायत समिती आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांपर्यंत वितरीत करण्यात आली आहेत. हा संपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती श्रीमती लता कर्णे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागरीजन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. दिनकर बोर्डे यांच्या थेट देखरेखीखाली राबवला जात आहे.

या मोहिमेत प्रामुख्याने हायब्रीड चारा बाजरी, गोड ज्वारी आणि मका यांसारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचा समावेश असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: एकूण ७,३०६ किलो हायब्रीड चारा बाजरी, १०.७२५ किलो हायब्रीड गोड ज्वारी २५,००८ किलो हायब्रीड मका (ADV-७५२) आणि २३,१७२ किलो हायब्रीड चारा मका बियाणे वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवांनी विनाविलंब आपल्या परिसरातील नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि हे बियाणे आपल्या ताब्यात घ्यावे. पावसाचे आगमन होताच ही बियाणे त्वरित पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून चारा टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवणार नाही आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता सुरक्षित राहून पशुपालकांचे होणारे नुकसान टाळता येईल. दुष्काळजन्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket