Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तिरंगा रंगातील फुगे, फुले, रांगोळी देशभक्तीपर गीते भाषणे आहारातही तिरंगा रंगाचे प्रतिबिंब अशा तिरंगामय वातावरणात ज्ञानशीला प्ले स्कूल आनंदून गेले.

तिरंगा रंगातील फुगे, फुले, रांगोळी देशभक्तीपर गीते भाषणे आहारातही तिरंगा रंगाचे प्रतिबिंब अशा तिरंगामय वातावरणात ज्ञानशीला प्ले स्कूल आनंदून गेले.

तिरंगा रंगातील फुगे, फुले, रांगोळी… देशभक्तीपर गीते… भाषणे… आहारातही तिरंगा रंगाचे प्रतिबिंब… अशा तिरंगामय वातावरणात ज्ञानशीला प्ले स्कूल आनंदून गेले. 

निमित्त होते, ज्ञानशीला प्ले स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फूड महोत्सव, बालचमुंची भाषणे व देशभक्तीपदर नृत्य सादरीकरण कार्यक्रमाच्या आयोजनाचे. या प्रसंगी अधिकराव यादव, काकासाहेब संकपाळ, रामदास महाराज आरेवाडीकर, दिनकरराव बाबर, जावेद मुल्ला, सलीम मुल्ला, प्रकाश पाटील, पवन गुरव, प्रवीण तिकुडवे, विलास पाटील, नितीन पवार, निवृत्ती महाराज आरेवाडीकर, दादा महाराज आरेवाडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अधिकराव यादव म्हणाले, ज्ञानशीला प्ले स्कूलतर्फे चिमुकल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण अनेकविध उपक्रम राबविले जातात. भारतीय स्वातंत्र्याचे महत्व नव्या पिढीला माहिती होण्यासाठी स्वातंत्र्यांसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे जीवन मुलांपुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. हेच विचार मुलांचे भविष्य घडविण्यासाठी पाया ठरतील. 

ह भ प रामदास महाराज आरेवाडीकर म्हणाले, सध्याची पिढी अनेक वात्रट गाण्यांवरती थिरकताना दिसते. सण-उत्सवांमध्ये असेच प्रकार सुरु असल्याने त्याला गालबोट लागत आहे. चिमुकल्यांचे भविष्य अशाच मार्गावर न जाता ते संस्कारक्षम व्हावेत, यासाठी ज्ञानशीला प्ले स्कूल प्रयत्न करत आहेत. देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करत बालचमूंनी संस्काराची बीजे स्वत:मध्ये रोवण्यासाठी सुरुवात केली आहे. भविष्यात नक्कीच ही बीजे फुलतील. 

ज्ञानशीला प्ले स्कूलमधील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. भाषण करणाऱ्या चिमुकल्यांना भरभरुन टाळ्यांची साथ मिळाली. यावेळी आयोजित फूड महोत्सवात सादर केलेले खाद्यपदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटत होते. विविध कार्यक्रमांनी ज्ञानशीला प्ले स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

फूड महोत्सवातही देशप्रेम

ज्ञानशीला प्ले स्कूलमध्ये आयोजित फूड महोत्सवात पालक व मुलांचे देशप्रेम दिसून आले. रोजच्या आहारात तिरंगा रंग साकारण्याची किमया पालकांनी केली होती. मुलांचा डब्बा आरोग्यदायी ठेवण्यासाठी अनेकविध कल्पनाही या महोत्सवात दिसून आल्या.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket