रुद्रांश जगताप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
सातारा प्रतिनिधी सातारा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालया तर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ६वी या गटात रयत शिक्षण संस्थेचे आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल,सातारा येथील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या रुद्रांश सुरेश जगताप या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
नगर वाचनालायतील त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे डॉ.आनंद ओक यांच्या हस्ते तसेच जेष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने,नगर वाचनालय कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले.नुकतेच रुद्रांशने जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर कनिष्ट महाविद्यालय वाई, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आंतर शालेय लहान गटातून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. रुद्रांश याने आजवर अनेक वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रभावी भाषण कौशल्याने श्रोते आणि परिक्षकांची मने जिंकली आहेत.
या यशाबद्दल त्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.