अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अंतिम वर्ष बी.फार्मच्या निकालात यशोदा टेक्निकल कॅम्पसची दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अंतिम वर्ष बी.फार्मच्या निकालात यशोदा टेक्निकल कॅम्पसची दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

अंतिम वर्ष बी.फार्मच्या निकालात यशोदा टेक्निकल कॅम्पसची दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

सातारा -डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या बी.फार्म अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

या परीक्षेत सय्यद अलिशा नजीरअहमद, माने रुचिता अरुण आणि गाढवे देशमुख अनुष्का बाळकृष्ण यांनी प्रत्येकी ८.९१ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच साबळे प्रणाली जीवन, पोतदार गौरव संजय, पवार नेहा शेखर, श्रुतिका सुनील दगडे यांनी प्रत्येकी ८.७३ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळविला. दोषी आर्या सचिन आणि देशमुख संपदा प्रकाश यांनी ८.६४ एसजीपीए मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला.

या निकालाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागातील तब्बल ९६ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन (विशेष प्रावीण्य) श्रेणीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेला यशोदा टेक्निकल कॅम्पसचा फार्मसी विभाग फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) मान्यताप्राप्त असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार फार्मसी शिक्षण देण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेकडून विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनासाठी पोषक शैक्षणिक वातावरण आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष मा. डॉ. अजिंक्य सगरे, कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे, प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव तसेच फार्मसी विभागप्रमुख डॉ. ए. एम. भागवत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही आपल्या गुणवत्तेची हीच परंपरा कायम राखत संस्थेचा नावलौकिक अधिक उंचवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अंतिम वर्ष बी.फार्मच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागाची गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट निकाल, विशेष प्रावीण्य संपादन करणारे विद्यार्थी आणि संशोधनाभिमुख शैक्षणिक वातावरण यासाठीची ओळख अधिक दृढ झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket