Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.सुजित जगताप शुक्रवारी साताऱ्यात

प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.सुजित जगताप शुक्रवारी साताऱ्यात

प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.सुजित जगताप शुक्रवारी साताऱ्यात

सातारा : पुण्यातील प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. सुजित जगताप हे शुक्रवारी, दि. १९ जुलै रोजी साता-यात उपलब्ध आहेत. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी डॉ. जगताप यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे.

सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, न्युरोसर्जन डॉ. सुजित जगताप हे येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोसिक सेंटर अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ. सुजित जगताप यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा. मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ. जगताप यांचा हातखंडा आहे. त्यांचे ३० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये प्रकाशित झाले आहेत. 

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9168432432 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket