यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे बी.आर्च. प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरू आर्किटेक्चर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण मार्गदर्शन; CAP नोंदणीला प्रारंभ
सातारा : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फतशैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सातारा यांची. केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) साठी सुविधा केंद्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वास्तुकला क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरणाची सुविधा संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बी.आर्च. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये विशेष मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला असून अनुभवी प्राध्यापक आणि प्रवेश समुपदेशक विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सहाय्य करत आहेत.
प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १४ जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच १५ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६ पर्यंत कागदपत्र पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. फिजिकल स्क्रुटिनी) निवडणारे विद्यार्थी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रे पडताळून घेऊ शकतात.
प्रवेशासाठी पात्रतेबाबत माहिती देताना महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा गणित विषयासह १०+३ डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच NATA किंवा JEE (Paper 2A – Architecture) पात्रता प्राप्त केलेले उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. राज्य CET Cell च्या नियमानुसार पात्र उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे आधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज डिझाईन स्टुडिओ, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल लर्निंग सुविधा, अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि उद्योगाभिमुख शिक्षणासाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोपक्रम, शाश्वत वास्तुरचना आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी वास्तुकला शिक्षणासाठी या संस्थेला प्राधान्य देत आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, “वास्तुकला हे केवळ इमारतींची रचना करणारे क्षेत्र नसून सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा.”
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांनी सांगितले की, “विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी सुविधा केंद्रात विशेष समुपदेशन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्यापासून ते कागदपत्र पडताळणीपर्यंत सर्व प्रकारचे सहाय्य येथे उपलब्ध करून दिले जात आहे.”
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने सर्व पात्र विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयास भेट देण्याचे आवाहन केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल करिअरच्या संधींसह वास्तुकला क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.




