अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नेत्रदान जनजागृती, वृक्षारोपण आणि योग अभियानास प्रारंभ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

नेत्रदान जनजागृती, वृक्षारोपण आणि योग अभियानास प्रारंभ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

नेत्रदान जनजागृती, वृक्षारोपण आणि योग अभियानास प्रारंभ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, संबंधित विभागीय अधिकारी, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील विविध विद्यापीठांचे एनएसएस संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह ६७० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

मंत्री पाटील म्हणाले की, नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान आहे. १० जून या जागतिक नेत्रदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. नेत्रदान जनजागृती उपक्रमांसोबत नेत्रतपासणी व नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करून हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा आणि समाजातील नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करावे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी अभियानाचा प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आईच्या सन्मानार्थ आणि आईच्या नावाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणे, हरित आवरण वाढवणे आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा एक उद्देश असून हे अभियान एक मोठी जनचळवळ बनली आहे. त्यामुळे ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व महाविद्यालयांमध्ये २१ जून रोजी योग मार्गदर्शन, योगाभ्यास शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket