अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या नोंदणीस मुदतवाढ

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या नोंदणीस मुदतवाढ

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या नोंदणीस मुदतवाढ

सातारा : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असून, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (DTE) प्रथम वर्ष पोस्ट एसएससी डिप्लोमा तांत्रिक अभ्यासक्रम तसेच डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी २२ जून २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अद्याप प्रवेश अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य आणि एनबीए मानांकन प्राप्त असलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा अंतर्गत कार्यरत यशोदा पॉलिटेक्निक येथे विविध रोजगाराभिमुख आणि उद्योगाभिमुख डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

 तसेच यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन या अभ्यासक्रमासाठी देखील करता येणार आहे.

यशोदा पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजीनियरिंग तसेच डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन यांसारखे आधुनिक आणि करिअरकेंद्रित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. 

यशोदा टेक्निकल कॅम्पस हे स्वायत्त (Autonomous) संस्थेचा दर्जा प्राप्त केलेले शैक्षणिक संकुल असून विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासक्रम, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, उद्योगसंलग्न प्रशिक्षण, इंटर्नशिप, संशोधनाच्या संधी आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जातो.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “तांत्रिक शिक्षण हे आजच्या युगातील यशस्वी करिअरचा मजबूत पाया आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या तांत्रिक शाखेत प्रवेश निश्चित करावा.”

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उद्योगाभिमुख कौशल्ये प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवेशाबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे विशेष हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी २ जुलै २०२६ पूर्वी अर्ज सादर करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल उचलावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket