Home » राज्य » कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

फलटण (प्रतिनिधी) : सोसायटीच्या कामकाजात कधीही राजकारण येऊ न देता सर्वसमावेशक व पारदर्शक पद्धतीने काम करत सर्वसामान्य शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे प्रतिपादन कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बापूराव घनवट यांनी केले.

ता. फलटण येथील कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या कुरवली खुर्द गावातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास चेअरमन बापूराव घनवट, सरपंच राहुल तोडकर, माजी सरपंच रमेश गोळे, राजाभाऊ चोरमले, दीपक निंबाळकर, मारुती घनवट, गोरख घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना चेअरमन घनवट यांनी सांगितले की, सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक लघुउद्योग, ट्रॅक्टर खरेदी, शेतकरी निवास, विहिरी बांधकाम तसेच इतर विविध कारणांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास व्हा. चेअरमन, सर्व संचालक, सभासद, शेतकरी, सोसायटीचे सचिव, सातारा जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

कुरवली खुर्द विकास सेवा सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात फलटण (प्रतिनिधी) : सोसायटीच्या कामकाजात कधीही राजकारण येऊ न देता सर्वसमावेशक

Live Cricket