उत्कृष्ट संघटक माननीय पुरुषोत्तम जाधव(वाढदिवस विशेष )
खंडाळा तालुक्यातल्या अतीट गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले पुरुषोत्तम जाधव यांनी सुरुवातीला पोलिस खात्यात नोकरी केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या प्रशंसेने प्रभावित होऊन त्यांनी समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्णय घेतला. त्याच भावनेतून नोकरी सोडून त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले.
लोकाग्रहास्तव त्यांनी 2009 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभेची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढली. त्यात त्यांना 2 लाख 35 हजार मते मिळाली, पण ते पराभूत झाले. या अपयशाने खचून न जाता त्यांनी त्यानंतर वाई विधानसभा व सातारा लोकसभेची दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढली. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघामध्ये अनेक विकास कामे त्यांनी आणली आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या गुड बुक मध्ये त्यांचे नाव असून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे.दांडगा जनसंपर्क आहे. युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांत लोकप्रिय आहेत ही त्यांची महत्त्वाची बलस्थाने आहेत.
मतदारसंघांत संपर्क, सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध, युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय, विविध सामजिक उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण झालेली प्रतिमा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आहे.2019 च्या पोटनिवडणुकीत तसेच त्यासोबत झालेल्या वाई मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरले. पण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. येणाऱ्या राजकीय प्रवासात त्यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळण्याचे संकेत असून यामुळे सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मोठी संधी असणार आहे.नेत्रदीपक नेत्याकडे अनेक आनंदी पुनरागमनास तुम्हाला वैयक्तिक आणि राजकीय यशासाठी शुभेच्छा देतो.लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आदरणीय पुरुषोत्तम जाधव साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
अली मुजावर, न्यूज हेड
सातारा न्यूज मिडिया सेवेन
