Home » राज्य » प्रशासकीय » इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन -जिल्हाधिकारी संतोष पाटील

इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन -जिल्हाधिकारी संतोष पाटील

इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने नियंत्रण कक्ष स्थापन -जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि.1: इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील

या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इराक येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.

सदर बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :

 जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा नियंत्रण कक्ष : 02162-232175 / 02162-232349

सातारा पोलीस नियंत्रण कक्ष : 02162-233833

मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket