Home » राज्य » प्रशासकीय » पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाई तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

सातारा दि. 13: जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीतील संभाव्य ताण लक्षात घेता वाई तालुक्यातील नागरिकांना एलपीजी (LPG) आणि पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होणे आवश्यक आहे.

अनेक ठिकाणी नारिकांकडून भीतीपोटी अतिरिक्त साठा केला जाण्याची शक्यता असलेने टंचाई निर्माण होवू शकते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी वाई तालुकास्तरावर (पुरवठा शाखा) तालुका नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती करीता व आवश्यक मदतीकरीता कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत 9637911699 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन तहसिलदार वाई यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket