इंजिनियर्स डे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सातारा -सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटर,एस ई इंजिनीयर असोसिएशन , एम एस ई बी सर्कल ऑफिस सातारा यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 20/ 9/ 2025 शनिवार रोजी एम एस ई बी सर्कल ऑफिस कृष्णा नगर सातारा येथे असोसिएशनचे अधिकारी पदाधिकारी आजी, माजी एस ई इंजिनियर्स व त्यांचे नातेवाईक यांनी सहभाग घेतला.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सातारा हॉस्पिटल & सातारा डायग्नोस्टिक सेंटर, श्री एम डी शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे रक्त शर्करा, ईसीजी,रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. याप्रसंगी कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर दत्तात्रय मोरे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर कपिल जगताप, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर पूजा कपिल जगताप व फेसिओमॅक्झिलरी सर्जन, जबडा, दात विकार तज्ञ डॉक्टर राजवर्धन शिंदे यांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या व मार्गदर्शन केले.
यावेळी माऊली ब्लड बँकेतर्फे श्री अजित कुबेर सर, डॉक्टर गिरीश पेंढारकर सर डॉक्टर अथर्व दांडेकर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तर मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सुविधा यांचे मार्गदर्शन व तपासणी डॉक्टर सर्वटे, अग्रवाल क्लिनिक यांचे तर्फे केले.
या मोफत तपासणी शिबिराचा सुमारे 110 शिबिरार्थींनी लाभ घेतला. या कामी ग्रुप ऑफ सातारा हॉस्पिटल साताराचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुरेश शिंदे, सीईओ विक्रम शिंदे डॉक्टर निलेश साबळे,डॉ अजीत पवार व हॉस्पिटल स्टाफ श्रीकांत देशमुख मॅनेजर पब्लिक रिलेशन ब्रदर निलेश काळे, शिवानी सिस्टर आणि राजमाता नर्सिंग स्कूल स्टुडन्ट यांचे सहकार्याने शिबिर उस्फुर्त सहभागासह संपन्न झाले.या साठी इंजिनियर्स स्टाफ श्री अमर कणसे श्री अभिजीत भोसले इतर सर्व सहकारी, अधिकारी, पदाधिकारी इंजिनियर्स यांचे सहकार्य लाभले.
