२५ वर्षांनी पुन्हा भरला शाळेचा वर्ग; महू येथील माजी विद्यार्थ्यांचे भावनिक स्नेहसंमेलन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महू.ता.जावली येथील सन 2000/ 2001 मध्ये सातवी पर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनी एकत्र येऊन माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत, व्यस्त कामातून एकत्र येऊन सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांना सन्मानाने बोलवले. त्यांना सुंदर बॅग भेट देऊन त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आपल्या शाळेला विद्यार्थ्यांना उपयोगी प्रोजेक्टर भेट दिला. याप्रसंगी सर्वांनी प्रथम स्वतःचा परिचय देऊन शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या.प्रत्येकाला असं वाटत होतं की पुन्हा एकदा बालपण यावे आणि आनंदाने शाळेत जावे. खरंतर अनेक हायस्कूलमध्ये दहावीचे, कॉलेजचे विद्यार्थी गेट-टुगेदर करताना सर्वत्र दिसतात. पण ज्या शाळेत आपण प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करून एक आदर्श निर्माण केला.प्राथमिक शाळेतील शिक्षणातच आमच्यावर खूप चांगले संस्कार झालेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रत्येकजण आपल्या गुरुजनांविषयी भरभरून बोलत होता. प्रत्येकाचे विचार ऐकून शिक्षक भारावून गेले होते. याप्रसंगी श्री काशिनाथ गोळेगुरुजी, श्री गंगाराम महाडिक गुरुजी, श्री रवींद्र गुरव गुरुजी, श्री गणेश तोडकर गुरुजी, श्रीमती चतुरा हाडके मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माने गुरुजी, उपशिक्षिका सौ अवंती ढेबे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी सचिन गोळे यांनी प्रास्ताविक केले, संतोष गोळे, दत्ता गोळे ,सागर गोळे यांनी मनोगते व्यक्त केली, मानसिंग जगताप यांनी सूत्रसंचालन केले, सुजित गोळे यांनी आभार मानले,
माजी विद्यार्थी सुधीर गोळे ,संध्या पवार,अर्चना चव्हाण,अश्विनी काटे, ललिता बिरामणे , निलम यादव, निलम शिर्के , ज्योती रांजणे , अर्चना भिलारे , रूपाली पवार, संदीप गावडे, अरुण गोळे, उषा दिघे, संगीता गायकवाड, रेश्मा पिसाळ उपस्थित होते. सर्वांनी आपल्या शाळेला भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले.
महू शाळेच्यावतीने पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांनी शेवटी गुरुजनांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि प्रेमाने निरोप घेतला. उपस्थित होते. सर्वांनी आपल्या शाळेला भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले. महू शाळेच्यावतीने पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांनी शेवटी गुरुजनांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि प्रेमाने निरोप घेतला. उपस्थित होते.
सर्वांनी आपल्या शाळेला भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले. महू शाळेच्यावतीने पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांनी शेवटी गुरुजनांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि प्रेमाने निरोप घेतला.




