एकनाथ ओंबळे यांच्या कार्याची दखल; केळघर परिसरातील विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्री देसाईंचे आश्वासन
केळघर :सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना निरपेक्ष भावनेने काम केले की त्याची पोहोच पावती ही लोकांच्या प्रेमातून मिळते. सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून शिवसेना वाढीसाठी जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांचे योगदान मोलाचे असून केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी व बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील,अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करंजे(मेढा) येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले ,माजी आमदार सदाशिव सपकाळ, तहसीलदार हणमंत कोळेकर, प्रा. श्रीधर साळुंखे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे, पांडुरंग जवळ, विलासबाबा जवळ, आनंदराव म्हसकर, प्रकाश लोखंडे, नीलेश मोरे, शांताराम कदम, प्रशांत तरडे ,समीर गोळे ,प्रशांत जुनघरे,सचिन शेलार, सुधीर करंदकर,श्रीरंग गलगले, सीताराम पवार, दत्तात्रय पोफळे, पांडुरंग सपकाळ,अमर दीप तरडे, प्रसाद धनावडे, संदीप कासुर्डे, तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.
मंत्री देसाई पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली जात आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले असून राज्य शासन या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देणार आहे. केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. बोंडार वाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी एकनाथ ओंबळे यांनी केली असून यासाठीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रयत्न करणार आहे. एकनाथ ओंबळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे नेते असून त्यांच्या पक्ष निष्ठेचा योग्य तो सन्मान लवकरच करण्यात येईल. जावळी तालुक्यासह राज्यभरातील रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकनाथ ओंबळे यांनी मदत मिळवून दिली असून अत्यंत साधी राहणी ,विनम्र स्वभाव व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यमग्न असलेल्या एकनाथ ओंबळे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले.
रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले, शिवाजी महाराजांच्या अतुलनीय इतिहासाची साक्ष देणारे रायगड व सातारा जिल्हा हे एकमेकांच्या जवळ आहेत. राज्यात कोणतीही आपत्ती आली की मदतीसाठी सर्वात पुढे असणारे आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. राज्यातीलअनेक लाडक्या बहिणींचा आशीर्वाद उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी आहे. लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे कधीच बंद करणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने लोकहितासाठी काम करत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनता त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे.एकनाथ ओंबळे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिलेदार म्हणून काम करत असून त्यांच्या या योगदानाची शिवसेना नक्कीच दखल घेईल .एकनाथ ओंबळे यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
चौकट:सावली येथील सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव म्हसकर यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून २५ हजार रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पालकमंत्री देसाई यांच्याकडे दिली.
केळघर परिसरातील विकासकामे मार्गी लावली जावीत यासाठी पालकमंत्री देसाई यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी एकनाथ ओंबळे यांनी केल्यावर दोन्ही मंत्र्यांनी निश्चितपणे विकासकामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही दिली.
शिवसेनेचे दोन मंत्री आज जावळी तालुक्यात आल्याने त्यांचे स्वागत शिवसैनिकांनी जल्लोषात केले.या अभिष्टचिंतन सोहळ्यात एकनाथ ओंबळे यांच्या वतीने उपस्थित महिलांना ब्लॅंकेटचे व पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
विश्वंभर बाबा दिंडी सोहळ्यासाठी ५१हजार रुपये व बोंडारवाडी धरण कृती समितीस ११ हजार रुपये देणगी एकनाथ ओंबळे यांनी दिली.या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकनाथ ओंबळे यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणांमधून केला .यावेळी उपस्थित दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त एकनाथ ओंबळे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळ केडंबे,जनसेवा प्रतिष्ठान, जावळी तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रयत्न केले.
