एकेज अकॅडमीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
सातारा – पश्चिम महाराष्ट्रातील सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतील बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवले आहे.विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन एकेज अकॅडमीचे नाव उंचावले आहे.महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाला.
अभिषेक जाधव याने 97.33% A/c 100 सातारा जिल्ह्यात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.चैत्रा स्वामी 96.83% हिने द्वितीय तर (मुली मध्ये प्रथम) क्रमांक पटकाविला आहे.रिया शाह हिने 96.67% तृतीय क्रमांक पटकाविला आहे. अनिका पारंगे 96.33% A/C 100/100. ललित देशिंगकर 95.67% वेदांत जगदाळे 93.33% अजिंक्य निकम 92.83% सई संभापुरे 92.33% राजेश्वरी निकम 92.17% श्रुती घोरपडे 91.83% निहाल लाहोटी 91.5% सारंग ठोंबरे 91.17% स्वरा राहेगावकर 91% मधुरा पवार 90.33% अकॅडमीतील 35 हून अधिक विद्यार्थी 85% उत्तीर्ण झाले आहेत.अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात पहिले तिनी क्रमांक पटकाविले आहेत.
वाणिज्य शाखेतील करियरसाठी एकेज अकॅडमी सातारा दीपस्तंभ असून. एकेज अकॅडमी मधून अनेक विद्यार्थ्यांनी सीए म्हणून आपले यशस्वी करिअर घडविले आहे. बारावी वाणिज्य शाखेतील यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एकेज अकॅडमीचे संस्थापक आनंद कासट यांनी अभिनंदन केले.
यश मिळवून, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय
बारावीत परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!
यापुढेही यशाचे अत्युच्च शिखर तुम्ही गाठत राहो
सीए आनंद कासट
