Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मांढरदेव काळूबाई व धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी पुढाकार; विराज शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

मांढरदेव काळूबाई व धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी पुढाकार; विराज शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

मांढरदेव काळूबाई व धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी पुढाकार; मंत्रालय स्तरावर हालचालींना वेग

वाई प्रतिनिधी -वाई तालुक्यातील मांढरदेव काळूबाई देवस्थान आणि नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान धोम या दोन प्रमुख श्रद्धास्थानांच्या विकासासाठी मंत्रालय स्तरावर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रस्तावाद्वारे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली.

ही मागणी वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी मांडली.

कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे सक्षम असणे अत्यावश्यक असते. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास या परिसरात मूलभूत सुविधा, भाविकांची सुरक्षा तसेच पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे पर्यटन वाढीसह स्थानिक छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री यांनी तत्वत: मान्यता देत ग्रामविकास प्रधान सचिवांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय पातळीवर मिळालेला हा ‘हिरवा कंदील’ वाई तालुक्याच्या विकासासाठी आशादायी मानला जात आहे.

या विषयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. भविष्यात या देवस्थानांचा विकास करताना दर्जा टिकवून ठेवणे आणि सांस्कृतिक वारसा जपणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी मांढरदेव पठारावरील ग्रामस्थ विजय मांढरे, जगन्नाथ मांढरे (मा. सरपंच, वेरुळी), एकनाथ मांढरे, अमित मांढरे, संतोष मांढरे, कार्तिक मांढरे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket