नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठिंब्याने धैर्यशील कदम यांची निवडणूक मोहीम अधिक मजबूत

मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठिंब्याने धैर्यशील कदम यांची निवडणूक मोहीम अधिक मजबूत

धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ बैठकीस मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती

सातारा : सांगली–सातारा विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच प्रचाराचे नियोजन आणि आगामी रणनीतीचा आढावा घेण्यात आला.

सातारा–सांगली विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना महायुतीतील मंत्री मकरंद पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याने निवडणुकीचे समीकरण अधिक बळकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे भाजपासाठी आव्हानात्मक मानली जात असलेली ही निवडणूक तुलनेने सुकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत धैर्यशील कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket