अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » डॉ.अजित एकल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ चे मानकरी

डॉ.अजित एकल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ चे मानकरी 

डॉ.अजित एकल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ चे मानकरी 

वाई दि १:-“बेस्ट फार्मास्युटिकल ट्रैनिंग अँड प्लेसमेंट इन्स्टिटयूट” म्हणून सातारा येथील इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी आणि सर्व्हिसेस या इन्स्टिट्यूटला नाशिक येथे महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ ने सन्मानित केले.

उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ हा भव्य दिव्य सोहळा नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरीज अँड सर्विसेस या संस्थेच्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. अजित एकल यांना मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते महाराष्ट् उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युको बँकेचे डीजीएम आणि झोनल अधिकारी अमलेश त्रिपाठी, जीएसटी चे सहाय्यक आयुक्त चेतन सिंग रजपूत यांची उपस्थिती होती. डॉ. अजित एकल यांनी इन्स्टा व्हिजन इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून मागील आठ वर्षात महाराष्ट्रभर शॉर्ट टर्म फार्मा ट्रेनिंग कोर्सच्या माध्यमातून ८०० च्या वर विद्यार्थ्यांना भारतभर १५० च्या वर नामांकित कंपनीत जॉब मिळवून दिला आहे. आत्तापर्यंत इन्स्टा व्हिजन बरोबर १५ युनिव्हर्सिटीमधून २५० च्या वर कॉलेजेस संलग्न झाले आहेत. इन्स्टा व्हिजन मध्ये बी एससी , एम एससी केमिस्ट्री , मायक्रोबायोलॉजी , बायो टेकनॉलॉजि तसेच बी फार्मसी, एम फार्मसी च्या विद्यार्थ्यांना एक महिन्यामध्ये क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी एशुरन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रेग्युलेटरी अफेअर्स , प्रोडक्शन , मेडिकल कोडींग या विभागासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. कोर्स प्रमाणपत्रासहित मुलाखतीची संपूर्ण तयारी करून घेऊन नोकरीसाठीची हमी दिली जाते. इन्स्टा व्हिजन ही आय एस ओ मानांकित आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा असून अत्याधुनिक उपकरणासहित सुसज्ज आहे. सदर इन्स्टिटयूट सातारा शहारातील मध्यवस्तीत रविवार पेठ असलेने विद्यार्थाना सर्व बाजून सोयीस्कर आहे . येथे वर्षभर प्रत्येक महिन्याला नवीन बॅचेस घेतल्या जातात. संपूर्ण महाराष्ट्रातून इन्स्टा इन्स्टा व्हिजन ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे.या पुरस्कारा बद्दल इन्स्टा व्हिजन इन्स्टिटयूट चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket