Home » राज्य » शिक्षण » रुक जाना नहीं’… जिद्दीचा प्रकाश! गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सनराइज कॅन्डल्सला भेट

रुक जाना नहीं’… जिद्दीचा प्रकाश! गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सनराइज कॅन्डल्सला भेट

रुक जाना नहीं’… जिद्दीचा प्रकाश! गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सनराइज कॅन्डल्सला भेट.

महाबळेश्वर: प्रतिनिधी जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर अंधारावर मात करून यशाचा प्रकाश कसा निर्माण करता येतो, याचा जिवंत अनुभव महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला. निमित्त होते, मोळेश्वर येथील जगप्रसिद्ध ‘सनराइज कॅन्डल्स’ या उद्योगाला दिलेल्या शैक्षणिक भेटीचे.

प्रायोगिक शिक्षणावर भर गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे ‘रिटेल’ व ‘मल्टी स्किल’ या व्यावसायिक विषयांच्या अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी या ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’चे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, या उद्देशाने दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ही भेट पार पडली.

डॉ. भावेश भाटिया संघर्षातून यशाकडे या भेटीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सनराइज कॅन्डल्सचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया. अंधत्वावर मात करून त्यांनी शून्यातून उभे केलेले मेणबत्तीचे साम्राज्य पाहून विद्यार्थी थक्क झाले. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित डॉ. भाटिया यांचा जीवनप्रवास ‘रुक जाना नहीं’ या पुस्तकाप्रमाणेच प्रेरणादायी आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भाटिया यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वाक्याची आठवण करून दिली:

“इंतज़ार करने वालो को सिर्फ उतनाही मिलता है, जितना कोशिश करने वाले छोड़ जाते हैं.” (प्रतीक्षा करणाऱ्यांना फक्त तितकेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.)कौशल्य विकासाचे धडे या व्हिजिटदरम्यान विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.

मेणबत्ती निर्मिती प्रक्रिया कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंतचा प्रवास. 

व्यवस्थापन कौशल्य:उत्पादन आणि साठवणुकीचे नियोजन.

  विपणन व विक्री:तयार मालाची जाहिरात आणि ग्राहक सेवा कशी असावी याचे धडे.

नियोजन आणि सहकार्य प्रशालेचे प्राचार्य श्री. पी. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या भेटीचे यशस्वी नियोजन व्यवसाय प्रशिक्षक श्री. अभिषेक साळुंखे, श्री. राहुल आखाडे व उपशिक्षिका कु. शोभा शिंदे यांनी केले. याकामी महाबळेश्वर येथील काकड आरती ग्रुपचे श्री. शिरीष गांधी, श्री. श्रीकांत जाधव व श्री. दिलीप शिपटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेवटी, प्रशालेच्या वतीने डॉ. भावेश भाटिया, सौ. नीता भाटिया, कुणाल भाटिया आणि संपूर्ण सनराइज कॅन्डल्स टीमचे आभार मानण्यात आले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची नवी ऊर्मी निर्माण झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान 

कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  सातारा जिल्ह्यातील कोडोली गावचे प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक

Live Cricket