Post Views: 31
शिव शंभो दुध संकलन केंद्रा मार्फत सभासदांना दिपावली किट वाटप करण्यात आले.
तांबवे —वडगांव हवेली ता कराड येथील शिवशंभो दुध संकलन केंद्रा मार्फत दूध उत्पादकांना दिपावली भेट म्हणून सतराशे रुपयांचे गृह उपयोगी दिपावली साहित्य किटचे वाटप करण्यात आले.यामध्ये एकुण पन्नास दुध उत्पादक शेतकरी ना यांचे वाटप करण्यात आले आहे.
दूध संकलन केंद्राचे प्रमुख शांताराम सांळुखे म्हणाले की आमच्या शिवशंभो दुध संकलन केंद्रा मार्फत आम्ही यावर्षी दुध उत्पादक शेतकरीना पैशाचा बोनस न देता दिपावली साठी लागणारे गृह उपयोगी साहित्य किटचे वाटप केले आहे.
यावेळी अशोक सुतार, महादेव सांळुखे,नंदा सांळुखे,कृष्णत जगताप,संजय गावडे, अधिक डावरे, सावकार जगताप,पोपट जगताप, हणमंत सांळुखे, शुभांगी ठावरे, मधुकर सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
