Home » राज्य » दीपावली आधीच ‘अजिंक्यतारा’ कामगारांची दिवाळी

दीपावली आधीच ‘अजिंक्यतारा’ कामगारांची दिवाळी 

दीपावली आधीच ‘अजिंक्यतारा’ कामगारांची दिवाळी 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )दिवाळीला अजून आठवडा आहे. मात्र त्या आधीच कामगारांच्या नावावर १९ टक्के ‘बोनस’ आणि दिवाळी ‘भेट’ देणारा अजिंक्यतारा साखर कारखाना महाराष्ट्रात नंबर ‘वन’ कारखाना ठरला आहे. प्रतिपादन कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी केले.

अजिंक्यतारा साखर कारखान्यातील कामगारांना दिवाळी ‘गिफ्ट किट’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांनी तहयात सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार हिताचेच निर्णय राबविले. तोच आदर्श वारसा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोपासाला असून त्यांच्या कल्पक आणि कुशल मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा साखर कारखान्याचा उत्तुंग भरारीचा आलेख सदैव उंचावला असल्याचे स्पष्ट करून कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते पुढे म्हणाले, कोणत्याही सहकारी संस्थेच्या उत्कर्षांत कामगार वर्गाचा सिंहाचा वाटा असतो. मातृ संस्थेप्रति असणारी आपली आत्मीयता, प्रामाणिकपणा व सेवाभाव हिच संस्थेची प्रगती करते. अजिंकतारा साखर कारखान्याचे कामगार आणि प्रमुख अधिकारी वर्गाची खंबीर साथ मिळाल्यानेच अजिंक्यतारा सदैव ‘अजिंक्य’ होता आणि ‘अजिंक्यच’ राहील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी मुख्य लेखापाल प्रविण जाधव, मुख्य अभियंता, रणजित पोळ, चीफ केमिस्ट श्री. सुरेश धायगुडे,लेबर ऑफिसरऍडव्होकेट रणजित चव्हाण, सेक्रेटरी श्री. बशीर संदे, शेती विभाग प्रमुख विलास पाटील व लालसिंग शिंदे, स्टोअर इन्चार्ज दत्तात्रय गाडे,पर्चेस अधिकारी पांडुरंग पवार, गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव, सिव्हिल विभाग प्रमुख शिवाजी थोरात,संगणक विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण,वरिष्ठ कक्ष अधिकारी सयाजीराव पाटील,वरिष्ठ टाईम किपर राजाराम कणसे, सॅनिटेशन अधिकारी संजीवन कदम, केनयार्डचे प्रमोद कुंभार, तसेच माजी कामगार संचालक नितीन भोसले, कामगार युनिनियन अध्यक्ष व पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket