दिव्या सर्जेराव जाधव यांची वन सर्वेक्षक म्हणून निवड
कराड-महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सैदापूर तालुका कराड येथील दिव्या सर्जेराव जाधव यांनी यश संपादन केले असून साडेतीनशे विद्यार्थ्यांमधून हे वन सर्वेक्षक या पदावर त्यांची निवड झालेली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोटी कन्या प्रशाला कराड कॉलेज चे शिक्षण वेणुताई चव्हाण या ठिकाणी झालेले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड येथून सर्वेर हा कोर्स पुर्ण केला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेश भोसले, मी नागरिक फाउंडेशन कराड चे अध्यक्ष व यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड, दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे केंद्रीय महा उपसंचालक दत्तात्रेय जाधव यांच्यासह विविध संस्था,संघटना, पदाधिकारी स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे