पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित
Home » राज्य » शिक्षण » जिल्ह्यातील एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यातील एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यातील एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

केळघर-जॉर्ज फर्नाडिस, एस. एम. जोशी, भाऊ फाटक यासारख्या दिग्गज कामगार नेत्यांनी एसटी कामगार संघटनेचे नेतृत्व केले असून कामगारांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या कामगार संघटनेचे कामगार चळवळीत महत्वाचे स्थान असून जिल्ह्यातील एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

 सातारा येथील कामगार भवनातील व्ही. एन. पाटील सभागृहात एसटी कामगार संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सभासदांशी संवाद साधताना मंत्री भोसले बोलत होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विभागीय सचिव अजित पिसाळ, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, संघटक सचिव सुशांत मोहिते, खजिनदार प्रकाश पाटील माजी बँक संचालक लाडूताई मडके,यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी,सभासद उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले ,ग्रामीण भागात एसटी हे दळण वळणाचे सर्वसामान्य जनतेचे महत्वाचे साधन आहे. सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीचे कर्मचारी अविरतपणे कर्तव्य बजावत आहेत. एसटी च्या कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, कामगार संघटनेच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी ही महायुती सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.केंद्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी प्रास्ताविकात कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती यावेळी देऊन मंत्री भोसले हे निश्चितच एसटी कामगारांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचा कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रारंभी कामगार नेते भाऊ फाटक यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.सभेच्या सुरुवातीला पहेलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विभागीय सचिव अजित पिसाळ यांनी आभार मानले. यावेळी कर्मचारी सेनेचे विभागीय प्रसिद्धी सचिव जितेंद्र खैरे यांनी कामगार संघटनेत प्रवेश केल्याबाबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सातारा विभागात सर्वाधिक सभासद नोंद करणाऱ्या महाबळेश्वर आगारासह इतर आगारांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.फलटण व पाटण आगारात कामगार संघटनेने कामगार सोसायटी निवडणुकित विजय मिळवल्याने निवडून आलेल्या संचालकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी कामगार प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेस सातारा विभागातील संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २४: राज्यात घरगुती पाइप गॅस

Live Cricket