नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अनुसूचित जातीच्या अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अनुसूचित जातीच्या अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अनुसूचित जातीच्या अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका आहे. अत्याचार पिडतांचे चार्जशिट न्यायालयात दाखल होण्यासाठी जातीचा दाखला लागतो. ज्या पिडीताकडे जातीचा दाखला नाही अशांची सामाजिक न्याय विभागाने त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन जातीचे दाखले काढून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पिडीतांना जातीचे दाखले मिळावे यासाठी संबंधित प्रातांधिकारी याच्याशी बोलण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत अशांची स्थानिक चौकशी करुन जातीचा दाखला देण्यात येईल, यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा. खून किंवा अत्याचार प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र एका वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कार्यवाही पुर्ण करावयाच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket