अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » यशोदा इन्स्टिट्यूट चे संजय कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार

यशोदा इन्स्टिट्यूट चे संजय कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार

यशोदा इन्स्टिट्यूट चे संजय कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार

सातारा -सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. संजय रामराव कदम यांना सन २०२६ चा “जिल्हास्तरीय आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह येथे आयोजित भव्य समारंभात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजधानी सेवा प्रतिष्ठान, कराड, अनुश्री फाउंडेशन, कराड तसेच संत शिरोमणी संत तुकाराम महाराज शिक्षण संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यशोदा शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, राधिकानगर या शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. संजय रामराव कदम यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यावर विशेष भर दिला. त्यांनी अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्य करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी झाले असून त्यांनी समाजात शिक्षणाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे.

त्यांच्या निष्ठावान, प्रामाणिक आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. या पुरस्कारामुळे यशोदा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्यालाही नवी प्रेरणा मिळाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी मा. श्री. संजय कदम यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध मान्यवर, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकृतीनंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मा. श्री. कदम यांचा गौरव केला. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री संजय मोरे, श्री शिर्के, श्री गणेश सुरवसे उपस्थित होते.

प्रा. डॉ. दशरथ सगरे यांची प्रतिक्रिया :

श्री. संजय कदम यांनी शिक्षण क्षेत्रात अत्यंत निष्ठेने आणि समर्पणभावनेने कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली आहे. शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजघटक घडविणारा शिल्पकार असतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कदम सर.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण यशोदा परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket