ग्रामनिधी अंतर्गत मागासवर्गीयसाठी 15 टक्के अनुदानातून तीन लाख 50 हजार रुपयाचे साहित्याचे वाटप
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)मागासवर्गीय यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच तेथील युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन ग्रंथालयासाठी लागणारे साहित्याचे वाटप पंचायतसमिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ग्रामपंचायत पाचवड तालुका वाई यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा टक्के अनुदानातून कपाट, टेबल खुर्ची, स्पीकर साऊंड सिस्टिम, शेगडी असे तीन लाख 50 हजार रुपयांचे साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती सरपंच महेश गायकवाड उपसरपंच अजित शेवाळे ग्रामविकास अधिकारी श्रीमती सारिका हाके मॅडम, विस्तार अधिकारी राहुल हजारे पंचशील सामाजिक सेवा मंडळ पाचवड अध्यक्ष संजय गायकवाड उपाध्यक्ष अविनाश गायकवाड सचिव दिलीप कुमार गायकवाड खजिनदार सचिन कांबळे व ग्रामपंचायत सर्व सदस्य व मागास वर्गीय समाज बांधव मोहन कुचेकर चंद्रकांत कुचेकर दादासाहेब गायकवाड आनंदा गायकवाड संजय गायकवाड सुनील गायकवाड बाबासाहेब गायकवाड विकास गायकवाड मनोज गायकवाड विजय गायकवाड रमेश गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार राकेश अडसूळ यांनी मानले.