Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » दि कराड अर्बन बँकेच्या वतीने चारचाकी वाहनांचे वितरण

दि कराड अर्बन बँकेच्या वतीने चारचाकी वाहनांचे वितरण

दि कराड अर्बन बँकेच्या वतीने चारचाकी वाहनांचे वितरण

कराड-पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असलेल्या कराड अर्बन बँकेने घरगुती वापरासाठी चार चाकीसाठी ८.५० टक्के व दुचाकी वाहन खरेदीसाठी केवळ ८ टक्के इतके आकर्षक व्याजदर उपलब्ध करुन दिल्याने त्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून ग्राहकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे. ग्राहकांची वाहन खरेदीसाठीची वाढती मागणी लक्षात घेता वाहन कर्जासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अर्बन कुटुंबप्रमुख श्री. सुभाषराव जोशी (भाऊ) यांनी केले.

दि कराड अर्बन को. ऑप. बँक लि. कराड यांचेमार्फत बँकेच्या विविध शाखांच्या वतीने अर्थसाह्य करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचे वितरण बँकेच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. समीर जोशी, उपाध्यक्ष श्री. शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, बँकेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सुभाषराव जोशी (भाऊ) पुढे म्हणाले, कराड अर्बन बँकेच्या वतीने नेहमीच ग्राहकांच्या गरजेनुसार माफक व्याजदरात विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. याचा सर्व नागरीकांनी लाभघ्यावा. कराडमध्ये नवीन प्रकारच्या गाड्या येत आहेत.

त्यामध्ये कराड अर्बन बँकेचा शेअर्स जास्त आहे. त्यामुळेच बहुतांशी गाड्या या अर्बन बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मिळत आहेत. ग्राहकांना कमीत कमी वेळेत जलद सेवा देवून गाड्या कशा देता येतील. यासाठी बँकेने खास व्यवस्था केली असून वाहन कर्जासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे, याचा नागरीकांना लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. जोशी यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 57 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket