दिलीप कुमार यांनी मेथड अॅक्टींगचा पाया घातला
दीपलक्ष्मी सभागृहात दिलीप कुमार यांच्यावर आधारित संगीत कार्यक्रम
सातारा –ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये मेथड अॅक्टींगचा पाया घातला. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेमध्ये घुसून अभिनय कसा करावा याचा दाखला त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेमधून दिला असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त पत संस्था आणि सुरसंगम यांच्या वतीने विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कामिनी पाटील, हेमंत कासार ,इकबाल भाई,अनिल वाळिंबे,शहाबुद्दीन शेख,युनुसभाई शेख़,प्राचार्य डॉ सुहास पाटील उपस्थित होते.
मुकुंद फडके पुढे म्हणाले,नंतरच्या कालावधीमध्ये दिलीप कुमार यांच्या मेथड ऍक्टिंगचा कित्ता अनेकांनी गिरवला. नसरुद्दीन शहा, अमीर खान किंवा नवाजुद्दीन सिद्दिकी या सर्वांनी याच अॅक्टींग पद्धतीचा पाठपुरावा केला.दिलीप कुमार यांनी अनेक वर्ष काम करूनही निवडक चित्रपटच केले.म्हणूनच त्यांनी केलेले सर्व चित्रपट उत्कृष्ट आणि अभिनयाचे आदर्श प्रदर्शन करणारे ठरले असेही मुकुंद फडके यानी नमूद केले.
