धन्वंतरी पतसंस्थेतर्फे ८.७५% व्याजदराने दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज वितरण
सातारा :- मा. राज्यपाल यांचे हस्ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने नवीन वाहन तारण कर्ज योजनेत सातारा शाखेचे ग्राहक श्री. मोहनीश भोसले यांना नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ या चारचाकी व सौ देविका गोसावी यांना हिरो मेस्ट्रो या दुचाकी वाहनाचे खरेदीसाठी त्यांना अर्थसहाय्य देऊन सदर वाहनाचे वितरण करण्यात आले. संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या हस्ते सदर वाहनाची चावी कर्जदारांना प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी वरील कर्ज योजने विषयी माहिती देताना सांगितले की, संस्थेमार्फत घर बांधणी, फ्लॅट खरेदी, बंगला खरेदी तसेच नवीन वाहन खरेदी, सोनेतारण इ. साठी ८.७५% व्याजदराने कर्ज तसेच गाळा, प्लॉट खरेदी व व्यावसायिक कारणांसाठी ११% व्याजदारने कर्ज दिले जाते, तसेच कर्ज प्रकारानुसार परतफेड मुदत १० ते १५ वर्षे आहे.
राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व इतर पतसंस्थांच्या तुलनेत धन्वंतरी पतसंस्थेचा व्याजदर सर्वात कमी असून द.सा.द. शे. ८.७५% व्याजदरामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित होत आहेत.
कर्जासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी, सर्व्हिसचार्ज आकारला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मा. व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांनी सदर योजनेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घेवून संस्था वाढीस हातभार लावावा असे आवाहन करून लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा असे सांगितले.
याप्रसंगी संचालक मा.डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकिल आत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सारिका मस्कर, डॉ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, डॉ. सुनिल कोडगुले, श्री. सूर्यकांत देशमुख उपस्थित होते.
संस्थेचे सभासद श्री. मोहनीश भोसले यांना संस्थेच्या सातारा शाखेमधून वरील कर्ज योजनेतून कागदपत्राची पूर्तता करताच त्वरित कर्ज देण्यात आले. याप्रसंगी श्री. मोहनीश भोसले व सौ देविका गोसावी यांचे नवीन वाहन खरेदीचे स्वप्न त्वरित पूर्ण झालेबद्दल व संस्थेने दिलेल्या विनम्र व तत्पर सेवेबद्दल धन्वंतरी पतसंस्थेच्या सर्व मा. संचालक, पदाधिकारी व सेवक वर्गाचे त्यांनी आभार मानले.
वरील सर्व उपस्थितांचे स्वागत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे यांनी केले कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सातारा शाखेचे व्यवस्थापक सौ. रूपाली शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.