अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » धनीच्या बागे लगतच्या तुंबलेल्या ओढ्यात जीव जंतूचा फैलाव शिवम कॉलनी गडकर आळी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

धनीच्या बागे लगतच्या तुंबलेल्या ओढ्यात जीव जंतूचा फैलाव शिवम कॉलनी गडकर आळी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. 

धनीच्या बागे लगतच्या तुंबलेल्या ओढ्यात जीव जंतूचा फैलाव शिवम कॉलनी गडकर आळी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. 

सातारा-पावसाळ्यापूर्वी सातारा शहरातील ओढे नाले स्वच्छता मोहीम सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केली होती. अनेक भागातील ओढे नाले स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल नगरपालिकेने टाकलेले होते. परंतु धनीच्या बागेलगतच्या असलेला मोठा ओढा हा गेल्या अनेक वर्षापासून तुंबलेला आहे. या ओढ्यात झाडे झुडपे व मातीचे ढिगारे साचलेले आहेत.

तसेच वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या या ओढ्यात पडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी थांबलेला आहे. पाण्याचा प्रवाह थांबल्याने त्या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे. त्यात रासायनिक द्रव्यांची भर पडली आहे. त्यामुळे या ओढ्यात जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. याबाबत येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी वारंवार संपर्क साधला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासना कडून पाहणी करण्यात आली आहे. अर्थात पावसाळ्यापूर्वी या ओढ्याची स्वच्छता होणे गरजेचे होते.

 तुंबलेल्या ओढ्या बाबत या भागातील नगरसेविका भारती किशोर शिंदे या संवेदनशील आहेत. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनीही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. आरोग्य सभापती धनंजय जांभळे व त्यांचे अधिकारी यांनीही या ओढ्याची पाहणी केलेली आहे. दूषित झालेल्या या ओढ्यात जीव जंतूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यांनीही पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप या ओढ्याची स्वच्छता न झाल्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.

श्रीरंग काटेकर सातारा. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket