युवा नेतृत्व मनोजदादा घोरपडेसाठी देवेंद्र फडणवीसांची बुधवारी पालीत सभा
सातारा -भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार मनोजदादा घोरपडे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणुक लढवत आहे. प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पाली ता. कराड येथे दि. ६ रोजी जाहीर सभेदरम्यान फोडणार आहेत. या सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने भाजप जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशीलदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब, मा. भिमराव पाटील काका मंडल अध्यक्ष, मा. संपतदादा माने माजी नगराध्यक्ष, मा. महेशबाबा जाधव समन्वयक, शंकरराव शेजवळ काका अध्यक्ष, सुरेश तात्या पाटील, वासुदेव माने काका शिवसेना अध्यक्ष, राजेंद्र घाडगे राष्ट्रवादी अजित पवार गट नेते, सचिन बेलागडे, अण्णासाहेब निकम माजी पं.समितीसदस्य, मा.सुनील बापू शिंदे विस्तारक, सिमा ताई घार्गे, मा.अंजलीताई जाधव मंडल अध्यक्ष, मा.जयवंत माने सर जिल्हाअध्यक्ष शिक्षक आघाडी, मा. तात्यासो साबळे, मा.निलेश माने विरोधी पक्ष नेते, प्रमोद गायकवाड, दिपक नलवडे, दिपक खडंग, विलास आटोळे, विकास आण्णा गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
