Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » देशातील आणखी एक धक्कादायक घटना केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 5 जणांचा मृत्यू

देशातील आणखी एक धक्कादायक घटना केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 5 जणांचा मृत्यू

देशातील आणखी एक धक्कादायक घटना केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 5 जणांचा मृत्यू

केदारनाथधामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 प्रवासी होते. 

अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गौरीकुंड-सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. 

दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे 6 भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीची एकजूट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेनां वाढते जनसमर्थन

Post Views: 41 महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीची एकजूट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदेनां वाढते जनसमर्थन महाबळेश्वर प्रतिनिधी –महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक

Live Cricket