दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री
सातारा : दि. 6 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, मर्या.,सातारा व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री सप्ताहाचे आयोजन दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ, सातारा येथे सोमवार दि. 7 ऑक्टोबर ते शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत केले असून या पुस्तकाचा प्रदर्शन समारंभ सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर पुस्तकाचे प्रदर्शन प्राचार्य राजेंद्र शेजवळ, प्राचार्य रमणलाल शहा, डॉ.संदीप श्रोत्री, पत्रकार मुकुंद फडके यांच्या शुभ हस्ते तसेच शिरीष चिटणीस यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.सदरची कार्यक्रमाची माहिती दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक- अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली
असून सदरच्या पुस्तक प्रदर्शनात मान्यवर प्रकाशन संस्थेची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून या प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन , उत्कर्ष प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरबंध प्रकाशन,अमित प्रकाशन, साहित्यअक्षर प्रकाशन, समकालीन प्रकाशन व इतर प्रकाशकांच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके 25 % ते 40 % सवलतीत सातारकर वाचक ,ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे. सदर प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ,अशी असून प्रदर्शन
सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. असे शिरीष चिटणीस यांनी नमूद केले. या पुस्तक प्रदर्शनाच्या अगोदर सुद्धा दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांनी सोमवार दि.12 ऑगस्ट ते शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 तसेच सोमवार 23 सप्टेंबर ते शुक्रवार 27 सप्टेंबर 2024 असा पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा आठवड्याहून जादा काळ महोत्सव भरवला होता व त्यास सातारकर वाचक यांचा भरगोस पाठिंबा मिळाला. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी या पुस्तक प्रदर्शनास संपर्क साधून 40% पर्यंत सवलत मिळून पुस्तके खरेदी करावे तसेच सातारच्या समस्त पुस्तक प्रेमी, ग्रंथप्रेमी,वाचकांनी पुस्तक प्रदर्शनाचा व विक्री चा लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केली आहे.
