Home » ठळक बातम्या » सातारा शहरात दहशत माजवणाऱ्या ‘डीडी गॅंग’च्या ६ जणांना २ वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार

सातारा शहरात दहशत माजवणाऱ्या ‘डीडी गॅंग’च्या ६ जणांना २ वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार

सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील शाहुपुरी हद्दीतील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या डीडी गैंग मधील ६ इसमांना सातारा पोलीसांनी संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन २ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार

सातारा -सातारा जिल्हयामधील सातारा शहरातील शाहुपुरी परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्ते विरुध्दचे सातत्याने गुन्हें करणारे सराईत टोळीचा प्रमुख १. धैर्यशिल उर्फ धिरज जयसिंग ढाणे वय ३३ वर्षे रा.५८ चिमणपूरापेठ सातारा ता.जि. सातारा तसेच टोळी सदस्य २. युवराज सुरेश मुरारी, वय ३० वर्षे, रा.४४०/४१ मंगळवार पेठ, सातारा ता जि सातारा ३. साद अय्याज बागवान, वय २२ वर्षे, रा. ८२६ शनिवार पेठ, सातारा ता जि सातारा, ४. प्रसन्न नारायण दिक्षीत, वय २५ वर्षे, रा. ७०/९७ व्यंकटपुरा पेठ, सातारा ता जि सातारा ५. योगेश ऊर्फ बॉबी भिमराव देवकर, वय ३१ वर्षे, रा ४६. मंगळवार पेठ, सातारा ता जि सातारा. ६. प्रितम सोमनाथ साळुंखे, वय २८ वर्षे, रा दिव्यनगरी कोंडवे सातारा ता जि सातारा.

 यांचे टोळीवर जबर दुखापत पोचवण्यासह, जबरी चोरी करणे, अवैद्य अग्निशस्त्र बाळगुन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा मारामारी करुन शिवीगाळ दमदाटी करणे, अनाधिकृतपणे गृह प्रवेश करुन दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, हददपार आदेशाचे उल्लंघन करणे यांसारखे दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने शाहूपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताय हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी केली होती,

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कुप्रसिध्द डीडी गैंग यांच्या टोळीवर बेकायदेशीर मार्गाने, दहशत करुन, स्वतः करीता व आपल्या टोळीतील सदस्यांसाठी गैरवाजवी अर्थिक व इतर फायदा मिळवण्या करीता सामान्य लोकांवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन जबर दुखापत पोचवण्यासह, जबरी चोरी करणे, अवैद्य अग्निशस्त्र बाळगुन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगामारामारी करुन शिवीगाळ दमदाटी करणे, अनाधिकृतपणे गृह प्रवेश करुन दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, हददपार आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर व सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतून त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

मा.तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळीचा प्रमुख १. धैर्यशिल उर्फ धिरज जयसिंग ढाणे वय ३३ वर्षे रा.५८ चिमणपूरापेठ सातारा ता. जि. सातारा तसेच टोळी सदस्य २. युवराज सुरेश मुरारी, वय ३० वर्षे, रा.४४०/४१ मंगळवार पेठ, सातारा ता जि सातारा ३.साद अय्याज बागवान, वय २२ वर्षे, रा. ८२६ शनिवार पेठ, सातारा ता जि सातारा. ४. प्रसन्न नारायण दिक्षीत, वय २५ वर्षे, रा. ७०/९७ व्यंकटपुरा पेठ, सातारा ता जि सातारा ५. योगेश ऊर्फ बॉबी भिमराव देवकर, वय ३१ वर्ष, रा ४६, मंगळवार पेठ, सातारा ता जि सातारा. ६. प्रितम सोमनाथ साळुंखे, वय २८ वर्षे, रा दिव्यनगरी कोंडवे सातारा ता जि सातारा यांची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दीतुन ०२ वर्षे हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी निवडणुक काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो. कॉ. अनुराधा सणस शाहूपुरी पो. स्टे कडील पोहवा महेश बोडरे, अब्दुल खलिफा, पो.कॉ केतन शिंदे, शुभम चव्हाण यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अपघात की घातपात? अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांची स्फोटक माहिती,

अजित पवार यांचा अपघात नाही घातपात आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केलेले प्रश्न मुंबई : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

Live Cricket