अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दरडींचा वाढता धोका, वाहनचालक भयभीत; ताथवडा घाटात तातडीने संरक्षण उपाययोजनांची मागणी

दरडींचा वाढता धोका, वाहनचालक भयभीत; ताथवडा घाटात तातडीने संरक्षण उपाययोजनांची मागणी

दरडींचा वाढता धोका, वाहनचालक भयभीत; ताथवडा घाटात तातडीने संरक्षण उपाययोजनांची मागणी

फलटण -ताथवडा ता. फलटण घाटातील दरडी मुळे वाहनचालक यांचा जीव गमवावा लागला असून आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल वाहन चालक व ताथवडा ग्रामस्थ करत आहेत, या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, फलटण पुसेगाव रस्त्या वरील ताथवडा या सुमारे चार किलोमीटर घाट रस्त्यावर डोंगरावरून मोठमोठे दगड़ निसटून रस्त्यावर येत आहेत.

या घाटामधून प्रवास करताना नुकताच चार चाकी वाहनावर मोठा दगड कोसळल्याने बारामती येथील वाहनचालक योगेश पोपट जगताप यांचा जागेवरच बळी गेला तर वाहनातील इतर तीन सहकारी गंभीर जखमी झाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालकाला जीव गमवावा लागला असल्याने या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणारे वाहन चालक संतप्त झाले असून तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

सध्या या ताथवडा घाटातील रस्ता दुरुस्ती उत्तम पद्धतीने झाली असल्याने वाहन चालक व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असले तरी घाटात दरडी कोसळण्याची भीती असल्यामुळे या घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, 

सामाजिक कार्यकर्ते अरविंद जाधव म्हणाले, सथ्या घाटातील रस्ता दुरुस्ती केलेली असून, या घाटातील दरडी कोसळण्याची शक्यता आहे, अशा दरडी तातडीने काढण्यात याव्यात. पाऊस पड़ल्यानंतर अचानक मोठे दगड डोंगरावरून रस्त्यावर पडतात, त्यामुळे अपघात होण्याबरोबरच दरड़ी कोसळून रस्ता वाहतूक वारंवार बंद होत आहे,त्यामुळे प्लॅस्टर अथवा लोखंडी जाळी लावून उपाययोज़ना करण्यात याव्यात अन्यथा आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेचा सामना करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.अशी प्रतिक्रिया दिली तर या घाटातील दरडी कोसळण्याची भीती व्यक्त करून घाटातील निर्जीव झालेले दगड व दरडी काढणे गरजेचे आहे.

सबंधित विभागाचे लक्ष देने गरजेचे आहे.मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अपगातात वाढ होण्याची दाट शक्यताा असल्याची संतप्त प्रतिक्रिया ताथवडा गावचे सरपंच दशरथ शिंदे यांनी दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket